Saturday, 26 August 2017

ऍबस्ट्रॅक्ट

घुसमळतंय धुसफुसतंय..
एक वादळ आतच घुटमळतय..
अनिश्चिततेच्या पारंब्यांवर
निपचित एकटंच लोंबकळतंय..
काळोखाचे डांबर सारण्यास
अष्मतैल शोधतंय..
सडक्या पाचोळ्यामध्ये
कोरडे सरपण शोधतंय..
अंधारल्या गुहेमध्ये
अश्माने मशाल पेटवतंय
आर्षकाळापासून वर्तमानापर्यंत
शोधतंय ते शोधतंय..
आत आत त्या गुहेच्या आत
फडफडत्या मशालीत
जे काही लुकलुकतंय..
जे काही चमचमतंय..
तेच !!!  ते शोधतंय..
परिवर्तित होणाऱ्या
प्रकाशाचा वेध घेतंय
पाठलाग करतंय
अचानक समोर येणाऱ्या
वटवाघुळांच्या जत्थ्याला
पाहून ते थबकतंय..
पण थांबत मात्र नाहीये..
आवेशाने हातातील मशाल
नाचवतय खेटवतय भिडवतय
पुन्हा वाट शोधतंय..
त्या भयाण ठिकाणी
त्याला अनेक नैराश्याच्या
सापळ्यात सापडलेले..
शस्त्र टाकलेल्यांचे
सापळे सापडतायत
पण त्या सापळ्यात
न जखडण्याचाच निर्धार
त्यानं केलाय..
धडपडतय फरफटतय
अगदीच काही नाही तर सरपटतय
पण, कुठलेही जोखड न जुमानता
कारण गंतव्य त्याला हाक देतंय
आणि त्याला कळलंय
पाचूमाणकं सापडतात ती
कृष्णगर्भ गुहेच्याच नाभीतळाशी


                      – अचलेय
                        (२२/०८/२०१७)

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...