Skip to main content

Posts

Featured

शक्यतेचे सृजन

मनातल्या वादळांना  सामोरं जाताना  तृण तुला व्हायचंय  जमिनीला घट्ट कवटाळून  वादळा समोर  नतमस्तक तुला व्हायचय  खूप केलीस याचना  खूप दिलास लढा  अनंत शक्यतांच्या  पावसात मात्र, जमिनीला तुझ्या तडा  हट्टाचे छत्र सोड आणि होऊदे  शुष्कतेचे निर्मूलन अपेक्षारहित झालास तर  होईल सौभाग्याचे सृजन आता होईल ते  होऊ द्यायच आहे  ओंजळ सोडून  तो देईल ते स्वीकारायचय कारण त्याला पण खरच आभाळभर द्यायचय.. आभाळभर द्यायचय.. ~ अचलेय ४ जुलै २०२६

Latest posts

ती एक उडी घ्यावीच लागते

पांघरूण

शालिग्राम

किनारा

कहानी

पूर्ण तू तयार है...

स्मरण असू दे

सावरकर

ऐसे वीर बाजीराव

नारी