काळ हा दीपमाळ जपतो
कंदिले झुलती नभी
चांदण्या शोधी शशी
अन सांज ही झाली अशी
मीच माझी वाट बघण्या
ठाकलो सागर किनारी
हा किनारा हीच वाळू
परतणारा हाच वारू
शांत लाटा उष्णश्या
बिलगती माझ्या पदा
गुह्य त्या सागर तळीचे
येऊन सांगी मला
शांतता माझ्यातली मग
हृदय स्पंदन ऐकवी
सागराचे गीत चाले
ताल ठोके अंतरी
रम्यश्या त्या ठिकाणी
लांब कोणी दिसले मला
नजीक जाता आले कळूनी
भेटीस आलो मी मला
~ अचलेय
No comments:
Post a Comment