धोंडा ओबड धोबड
होतो गोल गुळगुळीत
परी नदीत बुडणे
आले पाहिजे नशिबी
नदीचा तो तळ
तेथे प्रवाह अथांग
ध्यान लागता धोंड्यास
होतो त्याचा शालिग्राम
धार झाल्यास बोथट
कडा झिजल्या तरच
अहंकार जिरल्यास
अन स्वार्थ विरल्यास
होतो तुकतुकीत गोल
मिळतो त्याला फार मोल
परी नसते त्याचे त्याला
न घेणे, न देणे
~ अचलेय
No comments:
Post a Comment