Friday, 20 October 2023

स्मरण असू दे

 साक्ष तुझी आहे

आणि मेघ दाटले

कृष्ण आहे गजबजलेले

धवल का रीते ?


प्रीत क्षीण ओढ्या वाणी

गितसे जणू 

कोरड्या किनारी शब्द

अंकुरे कुठून ?


मिथ्य मोजण्यासी रचल्या 

कोसाच्या शीळा

शेंदुरात तुजला बघणे

भ्रांत का म्हणून ?


माझे माझे सांगून सारे

तुझे लाटले

अहंच्या नादामध्ये 

तत्व लोटले


पुरे दाटणे हे आता

पूर येऊदे

मळभ हटवूनी आम्हाला

तेज स्नान दे


क्षीरसागरी तू आम्हा

स्वैर क्रिडू दे

नादरंगी रंगून आम्हा

टाळ पिटू दे


पांडुरंग विठू माउली

विटेवर उभी

कटिबध्द पार करण्या

स्मरण असू दे


~ अचलेय

(२१.१०.२३)

No comments:

Post a Comment

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...