शक्यतेचे सृजन
मनातल्या वादळांना
सामोरं जाताना
तृण तुला व्हायचंय
जमिनीला घट्ट कवटाळून
वादळा समोर
नतमस्तक तुला व्हायचय
खूप केलीस याचना
खूप दिलास लढा
अनंत शक्यतांच्या
पावसात मात्र,
जमिनीला तुझ्या तडा
हट्टाचे छत्र सोड
आणि होऊदे
शुष्कतेचे निर्मूलन
अपेक्षारहित झालास तर
होईल सौभाग्याचे सृजन
आता होईल ते
होऊ द्यायच आहे
ओंजळ सोडून
तो देईल ते स्वीकारायचय
कारण त्याला पण खरच
आभाळभर द्यायचय..
आभाळभर द्यायचय..
~ अचलेय
४ जुलै २०२६
Wah! Go with the flow...
ReplyDelete