अंधारल्या रातीला, उदयाची चिंता आहे
अंधारल्या रातीत, उद्याची चिंता आहे
गतिमान जगण्याला, अगतिकता इंधन आहे
आक्रोशाच्या ठिणगीला, वेळेचे बंधन आहे
मनातील ढगांना, बेधुंद बरसणे आहे
विचारांचे चिख्खल धुवून, टाकायाचे आहे
पृथ्वीची परिक्रमा, आदित्या भोवती आहे
बोन्साय झाडाच्या, कळ्या उमलणे आहे
कामाच्या धान्याला, जात्यात भरडणे आहे
पोटाच्या यज्ञामध्ये, अर्घ्य टाकणे आहे
गर्दीमध्ये कोणाला, गृहरक्षण करणे आहे
गर्दीत होऊ पाहणारा, विध्वंस टाळणे आहे
अवैध काळ्या कामांना, सरकारी छप्पर आहे
वखवखल्या दानावांना, क्लीनचिट देणे आहे
ढोंगी पाखंडी बाबा, धर्म रक्षितो आहे
बलात्कार करुनी, स्त्रीशक्ती पूजितो आहे
म्यानामधल्या समशेरी, अगदीच गंजल्या आहे
म्यानावरचे अस्तर, संपूर्ण झिजले आहे
डोळ्यांवरचे चष्मे, वाफाळले आहे
मिथ्य जगीचे काचांवर, बाष्प बनले आहे
हेच काळ्या रातीचे, विदारक सत्य आहे
हेच काळ्या रातीचे, भीषण सत्य आहे
– अचलेय
( ३१/०८/२०१७ )
अंधारल्या रातीत, उद्याची चिंता आहे
गतिमान जगण्याला, अगतिकता इंधन आहे
आक्रोशाच्या ठिणगीला, वेळेचे बंधन आहे
मनातील ढगांना, बेधुंद बरसणे आहे
विचारांचे चिख्खल धुवून, टाकायाचे आहे
पृथ्वीची परिक्रमा, आदित्या भोवती आहे
बोन्साय झाडाच्या, कळ्या उमलणे आहे
कामाच्या धान्याला, जात्यात भरडणे आहे
पोटाच्या यज्ञामध्ये, अर्घ्य टाकणे आहे
गर्दीमध्ये कोणाला, गृहरक्षण करणे आहे
गर्दीत होऊ पाहणारा, विध्वंस टाळणे आहे
अवैध काळ्या कामांना, सरकारी छप्पर आहे
वखवखल्या दानावांना, क्लीनचिट देणे आहे
ढोंगी पाखंडी बाबा, धर्म रक्षितो आहे
बलात्कार करुनी, स्त्रीशक्ती पूजितो आहे
म्यानामधल्या समशेरी, अगदीच गंजल्या आहे
म्यानावरचे अस्तर, संपूर्ण झिजले आहे
डोळ्यांवरचे चष्मे, वाफाळले आहे
मिथ्य जगीचे काचांवर, बाष्प बनले आहे
हेच काळ्या रातीचे, विदारक सत्य आहे
हेच काळ्या रातीचे, भीषण सत्य आहे
– अचलेय
( ३१/०८/२०१७ )