स्वप्नांसाठीचा राखीव वेळ त्यात गमवत होतो
शब्द वेचुनी मुठीमध्ये नोटिंग ऍप शोधत होतो
शब्दांची जागा ठरवण्याच्या भरात मूळ भावनाच विसरत होतो
त्यात काही व्हीआयपी शब्द रुसून निसटत होते
मग त्यांची शोधमोहीम मी गुगल वर घेत होतो
या सगळ्यात कीपॅड मात्र उगाच खरडत होतो
फोनच्या प्रकाशाने शेजारची झोप भरडत होतो
आज कदाचित माझी कविता माझ्यावर रुसली होती
प्रत्येक शब्दासाठी माझी कसोटी पाहत होती
डोळ्यामध्ये आता माझ्या झोप दाटली होती
शब्दांनी आज माझी मस्करी थाटली होती
माझी अधुरी कविता पूर्ण कधीना झाली
मला चकवा देऊन माहेरी निघून गेली
~ अचलेय
(८-जुलै-२०१८ )