दुर्गम पहाडात जन्मल्यावर
खडकात आदळण्याचा धोका पत्करून
सुसाट वारा लांबवर फेकू पहात असताना
पायथ्याला भिडणाऱ्या लाटा ललकारत असताना
आणि मृत्यू काय पण जगणेही काय असते
हे माहीत नसताना…
तुमच्या अंतःप्रेरणेचा हात गच्च पकडून…
जगाच्या दृष्टीने ती आत्महत्या असताना
ती एक उडी घ्यावीच लागते
ती एक उडी घ्यावीच लागते
गडद पारतंत्र्यात जन्मल्यावर
गोळ्यांच्या वर्षावाला चकवा देऊन
थंड झोंबणारा समुद्र गिळू पाहात असताना
रक्ताळलेले शरीर तुमच्या विरुद्ध विद्रोह करत असताना
आणि स्वातंत्र्य काय पण दिवसाचे ऊनही
कधी नशिबी येईल का
हे माहीत नसताना…
तुमच्या आत्मप्रेरणेला घट्ट कवटाळून…
जगाच्या दृष्टीने ती आत्महत्या असताना
ती एक उडी घ्यावीच लागते
~ अचलेय
(२९ एप्रिल २०२५)