Wednesday, 28 June 2017

झोपाळा

बसलो होतो झोपाळ्यावर 
लिहायचे होते काही
वारा पाने उधळीत होता...
तुषार भिजवी शाई...
त्या चिंब ओल्या पानांवर
शब्दांचे उठले तवंग
अर्थानर्थ होऊ घातले
सारा बिकटच नाही प्रसंग?!
म्हणून मिटूनी घेतली वही
आणि तेवढ्यात आली ती!
तिला वाटले, मी लपवले
तिच्याचपासून काही..
म्हणू लागली "दाखवना रे
असे आहे तरी काय त्यात?"
मग नाईलाजाने उघडली वही
अन पान उघडले भलतेच!
तिच्याच वरची कविता आता
वाचली होती तिने
विचारू लागली मग मला
"कोणाबद्दल हे आहे?"
"आता हिला काय सांगू?"
हा यक्षप्रश्नच होता!
भांबावलेल्या मला
मग तिने जरा सावरूनच विचारले
"सांगायचे नसेल तर, असू दे
ठेव तूझ्याच पाशी"
मग मी पण तिला उत्तर दिले
"अगं, बऱ्या असतात अश्या कविता
चारचौघींना रिझवायला...
कोरड्या झालेल्या मनाला
चिंब चिंब भिजवायला"
माझ्या उत्तराने
तिची उत्सुकता होती शमली
पण माझ्या उत्तराने मी
एक संधी होती गमावली

                        - अचलेय

4 comments:

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...