Wednesday, 28 June 2017

निवडणूक आणि प्रचार

आली आली निवडणूक...
जणू डोंबर्याचा खेळ...
दिवसा आचार विचार...
राती बसतात 'चार'...
दिवसा प्रचार प्रचार...
राती माझा 'स्मॉल'च भर...
दिवसा नैतिकतेचे धडे...
राती पैस्याचे लोभडे...
राहो कुणीही उभे...
पडो कुणीही आडवे...
चरून जातात गाढवे...
मतदानाला....!
मग निकाल निकाल...
काय किती अन कुठे झाकालं...
जेता रटे पैश्यांचे पाढे...
अन हरणाऱ्याचे
पडे झडे माल वाढे...!

                   
                        ― अचलेय  
                           (२३/०२/२०१७)

No comments:

Post a Comment

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...