चांदण्यांच्या रोषणीने सागरी तळ गाठला
शिंपल्यातील सुप्त मोती त्यात न्हाऊ लागला
मोतीयाने चांदण्यांना स्नेह अंमळ धाडला
फेन जो लाटेतला हा स्नेह त्याने लाटला
ह्या लाटलेल्या रोषणीने अन किनारा गाठला
चाल अल्लड जणू मृग वनी, ती चालली पाण्यातुनी
चुंबीण्या ती पावले रोषणी सरसावली
साजणाची वाट आता क्षितिजही पाहत असे
सारण्या विराहास आता नक्षत्र बदलू लागले
पूर्तीण्या क्षुधेस आता चांदणे ही सांडले
रात्रीच्या पडद्यातूनी अन गलबते डोकावली
थंड त्या वाऱ्यामध्ये ती शीडही थरकापली
एकट्या चंद्रास ती चांदणी अन लाभली
एकट्या चंद्रास ती चांदणी अन लाभली
~ अचलेय
( ४ सप्टेंबर २०१८ )
शिंपल्यातील सुप्त मोती त्यात न्हाऊ लागला
मोतीयाने चांदण्यांना स्नेह अंमळ धाडला
फेन जो लाटेतला हा स्नेह त्याने लाटला
ह्या लाटलेल्या रोषणीने अन किनारा गाठला
चाल अल्लड जणू मृग वनी, ती चालली पाण्यातुनी
चुंबीण्या ती पावले रोषणी सरसावली
साजणाची वाट आता क्षितिजही पाहत असे
सारण्या विराहास आता नक्षत्र बदलू लागले
पूर्तीण्या क्षुधेस आता चांदणे ही सांडले
रात्रीच्या पडद्यातूनी अन गलबते डोकावली
थंड त्या वाऱ्यामध्ये ती शीडही थरकापली
एकट्या चंद्रास ती चांदणी अन लाभली
एकट्या चंद्रास ती चांदणी अन लाभली
~ अचलेय
( ४ सप्टेंबर २०१८ )
👌
ReplyDeleteOutstanding!! 👌
ReplyDelete