हातातले स्कॉचचे गलासेस..
ब्लुटूथ स्पीकर वर लावलेल अरिजित सिंघ च शांत , गोड गाणं; वाऱ्याच्या गोंगाटात विरून जात होतं..
अश्यावेळी आमच्या लयीत तल्लीन झालेली उष्मसखी शेकोटी..
समुद्राचा थंडावा आम्हाला सोपावणारा तो वारा..
उंच उंच झाडांमध्ये जमवलेली बैठक..
लॅम्प पोस्ट च्या घिरट्या घालणाऱ्या प्रकाशात,
अधून मधून चमकणाऱ्या त्या समुद्राच्या लाटा..
ज्या आता पर्यंत आम्हाला फक्त ऐकू येत होत्या..
स्वतःच्या अस्तित्वाची चुणूक आम्हाला दाखवत होत्या..
रात्र अमावस्येची असल्याने चंद्राच्या अपरोक्ष अधिकच लुकलूकणारे चांदणे..
विश्वाच्या अति भव्यतेची कल्पना आम्हा जिप्सीजना करून देत होती..
दिवसभराच्या प्रवासाने तापलेली माझी बाईक, स्वतःच्या इंजिनची ऊब टायर जवळ एकमेकांना कवटाळून झोपलेल्या श्वान माता पुत्रांना निरिच्छ देत होती..
किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा मोत्यांची घरे,त्यांचे अवशेष वाळूत भिरकावत होत्या..
आम्ही आगीच्या इतक्या जवळ बसलो होतो की आमच्या कपड्यांना पण शेकोटीचा भाजका गंध चिकटला होता..
आमच्या आणि शेकोटीच्या सलगीला जितकी तिची ऊब कारणीभूत होती तेवढाच किनाऱ्यावरचा खट्याळ थंड वारा..
अमेय आणि मी तश्या बऱ्याच ट्रिप्स केल्या आहेत सोबत, पण तरीही ह्या रोड ट्रिपच्या आठवणींचा भ्रमर हा बरेचदा मनात भिरभिरतो आणि रेंगाळतो; गप्पा गप्पांमध्ये आपले गाठोडे सोडतो; माझ्या आणि अमेय च्या मनात.

No comments:
Post a Comment