Saturday, 23 March 2019

ती एक कविता

त्या ग्रंथ सागरा काठी
ती एक कविता होती

ती नाव वाटली होती
तिचे शब्दच सागर होते

ती इतकी अथांग होती
मी त्यावर तरलो होतो

मज लाटांचे सामर्थ्य
तिचे आशय पुरवत होते

मी तिच्या भावनांमध्ये
नकळत भरकटलेलो

त्या प्रेम सागरामध्ये
नाहक फरफटलेलो

मी गुंतलोही तिच्यातच
अन भिजलोही तिच्यातच

खोल तिच्या तळात
बेधुंद बुडालो होतो

माझ्या प्रश्न शिंपल्यांना
तिचे किनारे होते

अन प्रश्नार्थक नजरेला
तिचे डोळे मिटणे होते

कळले मला जेव्हा ते
की काल्पनिक ती आहे

पापणीत वेचून मोती
मी निघून आलो वरती

 
                          ~ अचलेय

1 comment:

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...