Thursday, 21 November 2019

हे मना...

रित्या झालेल्या भांड्यात
जसा गोरसाचा थेंब
ओल्या झालेल्या पिलाला
पंख मायेची ती उब
कासावल्या भ्रमराला
कंठी मधाचा तो थेंब
माझ्या व्याकुळ मनाला
आहे कवितांची भेट
अधिरल्या मना साठी
शब्द गुंफते दावण
सुसाटल्या विचारांनी
नभ आणले दाटून
कडाडल्या विजेमध्ये
आहे वादळाचे बीज
कारे जागवतो मला
अंधारली रात निज
बघ चांदण्यांची वेल
तुटला तारा बघ वेच
बाई किती मी भागले
आता तरी रे तू झोप
आता नको ती रिमझिम
नको वारा थंडगार
नको नभांचे दाटणे
नको शब्दांचे गुंफणे
रिता असला जरी तू
काळजास कवटाळील
तू निजरे जरासा
तुही आहे थकलास

                 ~ अचलेय 

No comments:

Post a Comment

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...