Monday, 23 December 2019

निशिगंध

विरलेल्या दिवसामध्ये
गंध कालचा होता
निशिगंध बहरला होता
रजनीत हरवला होता
थंडगार त्या वाऱ्याने
गारठून भावना गेल्या
पांघरून शब्द भोवती
मी श्वास घेतला होता
प्रत्येक नकारा वेळी
रात्र थाटली होती
तरी चंद्र मागण्या मी
सदैव जागा होतो
चंद्र पाहण्या साठी
मी हिंदोळ्यावर रमलो
प्रतिबिंब ज्या तळ्यात
तो वर्षाव कालचा होता
रात्रीच्या ललाटी
हात पोहोचले जेव्हा
तो धूसर धवल मेघात
नाहक गुरफटला होता
जरी चंद्र लाभणे नाही
तरी निशिगंध बहरणे आहे
ही रात्र दाटणे आहे
अन गंध हरवणे आहे

                              ~ अचलेय

ती एक उडी घ्यावीच लागते

ती एक उडी घ्यावीच लागते  दुर्गम पहाडात जन्मल्यावर  खडकात आदळण्याचा धोका पत्करून  सुसाट वारा लांबवर फेकू पहात असताना  पायथ्याला भिडणाऱ्या लाट...