विरलेल्या दिवसामध्ये
गंध कालचा होता
निशिगंध बहरला होता
रजनीत हरवला होता
थंडगार त्या वाऱ्याने
गारठून भावना गेल्या
पांघरून शब्द भोवती
मी श्वास घेतला होता
प्रत्येक नकारा वेळी
रात्र थाटली होती
तरी चंद्र मागण्या मी
सदैव जागा होतो
चंद्र पाहण्या साठी
मी हिंदोळ्यावर रमलो
प्रतिबिंब ज्या तळ्यात
तो वर्षाव कालचा होता
रात्रीच्या ललाटी
हात पोहोचले जेव्हा
तो धूसर धवल मेघात
नाहक गुरफटला होता
जरी चंद्र लाभणे नाही
तरी निशिगंध बहरणे आहे
ही रात्र दाटणे आहे
अन गंध हरवणे आहे
~ अचलेय
गंध कालचा होता
निशिगंध बहरला होता
रजनीत हरवला होता
थंडगार त्या वाऱ्याने
गारठून भावना गेल्या
पांघरून शब्द भोवती
मी श्वास घेतला होता
प्रत्येक नकारा वेळी
रात्र थाटली होती
तरी चंद्र मागण्या मी
सदैव जागा होतो
चंद्र पाहण्या साठी
मी हिंदोळ्यावर रमलो
प्रतिबिंब ज्या तळ्यात
तो वर्षाव कालचा होता
रात्रीच्या ललाटी
हात पोहोचले जेव्हा
तो धूसर धवल मेघात
नाहक गुरफटला होता
जरी चंद्र लाभणे नाही
तरी निशिगंध बहरणे आहे
ही रात्र दाटणे आहे
अन गंध हरवणे आहे
~ अचलेय
अप्रतिम!☺️
ReplyDeleteकाही वर्षांपूर्वी एका less fueled aeroplane ची post केली होती का आपण? How pilot managed to land the plane without fuel अशी post होती. असेल तर please repost करा
ReplyDelete