Friday, 13 October 2017

That Low Frequency Noise

     
          It was an electronic signal I guess. तिला जाऊन आता १० वर्ष झाले होते. आई एवढी तासंतास कोणाशी बोलत असते ? या विचारातून एक दिवस जेव्हा मी तिला विचारलं की तू कोणाशी बोलतेस एवढा वेळ तर तिने जरा जपूनच मला सांगितलं की तीला रोज आजी चा फोने येतो. ते ऐकल्या वर मला जरा भीतीच वाटली होती. मग विचार आला की आईचं मानसिक संतुलन तर नाही ना बिघडल आहे? मग त्या विचारातूनच जन्मदात्या आईचीच भीती वाटायला लागली. उगाचच तिचं बोलणं हसणं भयावह वाटू लागलं. शेवटी खूप विचारा अंती दुसऱ्या दिवशी मी आई ला म्हंटलं की मला पण आजी शी बोलायचं आहे. 
आई म्हणाली "ठीक आहे".
         पण त्या दिवशी फोन आलाच नाही. त्यामुळे तो दिवस पण नैराश्य आणि भीती मध्ये गेला. त्या नंतर च्या दिवशी सकाळी ७ वाजता मला जाग आली ती टेलीफोन च्या रिंग ने. म्हणजे पहिली रिंग ही अशी impulsive होती आणि मग कमी होत गेली. उत्सुकतेने माझी झोप उडवली आणि मी फोन उचलणार तेवढ्यात हॉल झाडत असलेल्या आई ने फोन उचलला. क्षण दोन क्षण बोलल्या नंतर वळून सोफ्यावर बसली आणि मला इशाऱ्यातून म्हणाली की आजी चा फोन आहे.

        माझ्या काळजातली धडधड पुन्हा वाढली. मी पांघरूण झटकून आईच्या पुढ्यात उभा राहिलो तसं आई म्हणाली," अगं आई या नचिकेत शी बोलतेस का? तो काल विचारत होता की मी कोणाशी बोलते रोज तासंतास... अच्छा देऊ मग?" आणि आईने फोन माझ्या हातात पकडवला. मी घाबरत घाबरतच काही तरी बोलायचं म्हणून बोललो ," हॅलो, गुड मॉर्निंग... आजी!"
      पलीकडून एकदम क्षीण आवाज आला ,"काय रे कसा आहे ?" प्रथम मला वाटलं की मला भास होतोय फोन डेड असल्या वर जसा low frequency sound येतो ना 'ट्या... ' जो कानांना नकोसा वाटतो तोच sound असणार आणि तसा विचार केल्यावर बोलण्याचा आवाज अचानक बंद झाला आणि खरच low frequency आवाज ऐकू येऊ लागला. 
तेवढ्यात आई म्हणाली,"अरे बोल ना तिच्याशी असा गप्प का..?"
आणि पुन्हा मला आवाज ऐकू येऊ लागला,"अरे बाळा काय झालं तुला... फोन कट झाला का... तुला ऐकायला नाही येत आहे का?"
मी भानावर आलो आणि मग बोलू लागलो,"अगं काही नाही आवाज ऐकू येत नव्हता मला. आता येतोय.."
आजी," अच्छा मग ठीक आहे... बाकी कसं चाललंय, सगळं ठीक?"
मी," हो मस्त!"

आजी," हो बबी देते तशी मला सगळी खबर बात.!"
मला हे सगळं खूपच विचित्र वाटत होतं आणि त्या मुळे काही बोलायला पण सुचत नव्हतं.

म्हणून मी म्हटलं, " आजी, हे बघ आई काय बोलतेय.!" आणि आई जवळ फोन दिला. 
आई फोन वर," अगं, घाबरलेला दिसतोय तो.. पहिलीच वेळ आहे ना त्याची.."

मी दुसऱ्या खोलीत निघून गेलो आणि विचार करू लागलो,"हे आत्ता जे काही घडलं ते सत्य होतं की भास?  मला ऐकू येणारा खरच आवाज होता का low frequency noise?  का... मी पण आई सोबत वेडा झालोय?"

    माझा तो दिवस पुन्हा वाईट गेला .  कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं माझं. सतत डोक्यात त्याच गोष्टीचा विचार. एकीकडून आनंद पण होत होता इतक्या वर्षांनी आजीचा आवाज ऐकण्या बद्दल.. पण दुसरी कडे वेड लागण्याची भीती.. माझ्या मनात पुन्हा एक विचार आला की जर आजीचा आत्मा आम्हाला फोन करतोय तर मग तो स्वतः का नाही होत आमच्या समोर प्रकट.? नाही, म्हणजे जर आत्म्याला कुठे पण वावर करता येत असेल तर मग आजी direct घरीच का नाही येत? आणि ही नेमकी कुठल्या बूथ वरून फोन करते? का... कोणी फाजील मस्करी करतंय माझी आणि आईची; आजीचा आवाज काढून? अशे एकावर एक प्रश्न उपस्थित होतच होते.

       शेवटी मला एक idea सुचली आणि मी तसाच आमच्या area च्या BSNL ऑफिस ला पोहोचलो. तिथल्या तसल्या ढिल्ल्या ढेपाळलेल्या कामात शेवटी दोन शंभर च्या नोटांनी चैतन्य आणलं आणि मला माझ्या घरच्या टेली फोन चा सगळा कच्चा चिठ्ठा मिळाला. System generated call details होते ते. त्यात सगळे कॉल लॉग्स दिसत होते.

       कागदावरून थोडी नजर भिरभिरल्या वर एक विचित्र नंबर माझ्या डोळ्यांनी अधोरेखित केला होता. हा नंबर १४ आकडी होता. त्या नंबर संबंधी विचारायला मी त्याच क्लार्क कडे पुन्हा गेलो तर त्याने त्या बद्दल त्याला काहीच नाही माहीत बुआ म्हणून हात वर केले. जाऊद्या एक clue तर मिळाला म्हणून मी तो कागद घेऊन घरी परतलो. रात्री मी Google वर बराच वेळ search केलं. पण त्या नंबर विषयी मला काहीच नाही कळलं. शेवटी मी ठरवलं की आता आपण direct अजीलाच विचारायचं कि काय भानगड आहे ही सगळी. 

        दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी आई फोन वर बोलत होती तेव्हा मी तेथे गेलो आणि आईला विचारलं,"काय गं कोण? आजी आहे का ?"

आई," हो. बोलायचंय?" 
मी," हो " 
आई," हे घे ग आई.. बघ तुझा नातू काय बोलतोय ते..!"

मी," good morning आजी.. मला actually तुला काही विचारायचं आहे.."

आजी," विचार ना बाळा.. बिनधास्त विचार"

मी, "तू कुठून बोलतेय.. I mean स्वर्गात टेलिफोन ची सोय कधी पासून झाली?"
आजी हसायला लागली आणि म्हणाली," अरे वेड्या मी स्वर्गात नाही काई..!!" 
 मी," आ..मग कुठे आहेस?" 
आजी, " अरे मी स्वर्गात जाऊच शकली नाही "

मी," म्हणजे? तू काय बोलतेय ते मला कळत नाही आहे. "
आजी," हे बघ बाळा मी इथे जिथे कुठे अडकले आहे तिथे मी कशी पोहोचले या बद्दल च्या तांत्रिक बाबींबद्दल मला काही जास्त कळतच नाही.. हा पण इथे माझ्या सारखे शेकडो हजारो अजून लोक आहेत एवढं नक्की."
मी,"अच्छा,अगं मग तिकडे त्या लोकांमध्ये कोणी असेल ना ज्याला ह्या बद्दल माहिती असेल... तू हा फोन कसा करतेस.. कोण मदत करत तुला त्या साठी..?"
आजी,"अरे हा पिंट्या करतो ना मला मदत फोन करायला." 
पलीकडून आवाज आला," आजी कितीदा सांगायचं तुम्हाला मी पिंट्या नाही Alfred Pinto नाव आहे माझं !"

मी," आजी माझ त्या गृहस्ताशी बोलणं करून दे ना, Please!"

आजी," हो ठीक आहे विचारते मी त्याला... अरे पिंट्या बोलतोस का रे माझ्या नातवाशी?" 
     पिंटो ने थोडे आढेवेढे घेतल्या नंतर आजी ने त्याला माझ्याशी बोलण्यात काहीच खतरा नसल्याचं पटवून दिलं आणि शेवटी हे महाशय माझ्याशी बोलायला तयार झाले.

पिंटो," हॅलो, बोला सर " 
मी, " हॅलो, अहो सर वगैरे काय?" 
पिंटो, " अहो, सिंधू आजींचे तुम्ही नातू आहात म्हणून तर सर म्हंटलं.."

मी," म्हणजे ?" 
पिंटो, " अहो म्हणजे त्या आमच्या सर्वेसर्वा आहेत ना इथे या satellite वर..!"

मी, " satellite वर?" 
पिंटो, " हो.. आम्ही जेथे राहतोय तो satellite..!!"

मी, "एक मिनिट एक मिनिट..मित्रा एकतर तू मला अहो-जाहो काही करू नकोस आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला दे कारण आता मला अजून confusion नको आहे! मला सांग, हा सगळा प्रकार काय आहे? तू कोण आहेस? जिथेही आहेस तिथे कसा पोहोचलास? आणि फोन कसा करू शकतोस तू? हो आणि आजी सर्वेसर्वा काशी काय झाली तुमची??"

पिंटो," हो हो अरे बोलू देशील मला..!!"

मी, " हा okay.. पण पटकन सांग आता काय आहे ते?"

पिंटो," ठीक आहे... तर ऐक.. मी अल्फ्रेड पिंटो मूळचा केरळचा.. I was an ethical hacker before I died. " 
मी,"मग तू एवढं अस्खलित मराठी कस बोलतोय?"

पिंटो," Actually मी जी भाषा बोलतोय त्याला 'स्वर्गीय' किंवा हे liberals 'आत्मीय' म्हणतात.. ही भाषा म्हणजे मुळात low frequency sound waves असतात.. आणि ज्याला ते ऐकायचे आहेत त्याच्या brain मध्ये एक प्रकारचं electromagnetic field generate होत असतं.. जेव्हा या sound waves माणसाच्या ear drum पर्यंत पोहोचतात तेव्हा त्या electric signal मध्ये convert होतात आणि मग त्यांच्यात काही प्रक्रिया होऊन तुम्हाला तो आवाज तुमच्या मातृ भाषेत ऐकू येतो.. त्या प्रक्रिया नेमक्या काय आहेत त्यावर इथल्या वैज्ञानिकांच सौंशोधन चालू आहे."

मी," बापरे! पण मग तू इकडे कसा? तुझं वय काय होतं मारतानाच?"

पिंटो," मी मेलो तेव्हा अवघा २५ चाच होतो. दोन वर्षांआधी माझा selfie काढता काढता पाय घसरून दरीत कोसळून मृत्यू झाला. मागचं एक वर्ष depression मध्ये गेलं. सिंधू आजींनी आणि इथल्या लोकांनी मला त्यातून बाहेर पडायला मदत केली.  म्हणून मी आता इथे काम करायला सुरुवात केली आणि आता टेलिफोन ची व्यवस्था करून देतोय इथल्या लोकांना."

मी,"अरे पण मेल्यावर तू इथे कसा पोहोचलास?"

पिंटो, " अरे जेव्हा माणूस मारतो तेव्हा त्याच्या शरीरयष्टी प्रमाणे तो ६० ते ११० volts चा electric signal तयार करतो. जो photons मध्ये परिवर्तित होऊन या देहा पासून आणि नंतर पृथ्वी पासून दूर जायला लागतो. प्रकाशाच्या गतीने जाणारी ही wave नेमकी कुठे जाते हे अजून कोणालाच नाही कळलं आहे. जेव्हा मी मृत्युमुखी पडलो तेव्हा माझ्या आत्म्याची ही wave पण अशीच निघाली होती आणि काही कळण्याच्या आतच ती या satellite वर येऊन कोलाईड झाली. इथे पोहोचल्यावर मला कळलं की हा geostationary Satellite आहे. जो १९९५ मध्ये launch झाला होता. मी इथे दाखल होण्याच्या काही काळ आधीच हा out of order झाला होता. फेब्रुवारी २०१५ ला त्याचा २० वर्षांचा कार्यकाळ संपला होता. तो telecommunication साठीच वापरला जायचा. Out of order जरी झाला असला तरी त्याचे solar panels आणि electronic system चालू होती. माझ्या आधी पोहोचलेले electronic engineers या system ची व्यवस्थित देखभाल करत होते. पण त्यांना पृथ्वी वरच्या telecommunication centres ला connect करता येत नव्हतं. 
           जेव्हा त्यांना कळलं की मी एक ethical hacker आहे तेव्हा ते माझ्या मागेच लागले आणि मी जेव्हा depression मधून बाहेर पडलो तेव्हा त्यांनी माझ्याकडून आयुष्यात मी जी गोष्ट केली नव्हती अशी 'unethical hacking' करून घेतली आणि अशा प्रकारे आम्ही इथे पृथ्वीवर आमच्या आप्तस्वकीयांशी बोलू लागलो."

मी,"अरे पण जर आपला आत्मा photons च्या स्वरूपातला एक voltage signal तर मग how did you all get trapped in there?"

पिंटो,"अरे त्याच असं असतं.. की हा satellite आहे ३६००० किलोमीटर उंच अवकाशात. जेव्हा आमच्या आत्म्याचे photons येऊन या solar panels वर आदळलेत तेव्हा आम्ही उपग्रहाच्या generator मध्ये पोहोचलो. पण आत्म्याचे characteristics हे वेगळे असतात इतर signals or electromagnetic waves पेक्षा. त्यामुळे the bunch of photons which define a soul, always stay together.

       अश्या प्रकारे आम्ही या उपग्रहाच्या वेगवेगळ्या parts मध्ये त्याच्या metal body वर, त्याच्या electronic controllers मध्ये सतत वावरत असतो. इथे आमची संख्या आता बरीच वाढली आहे.. त्यामुळे satellite च voltage खूपच वाढलं आहे. त्यामुळे satellite ला काही damage होऊ नये म्हणून काही दिवसां आधीच तुझ्या आजीच्या सत्तेत येण्या नंतर नव्या सरकार ने 'Soul Traffic Control Unit' च नवं पथक तयार केलं आहे.

मी," अच्छा, आणि आजीची सत्तेत येण्याची काय भानगड आहे? तिकडे तुम्ही ही जी व्यवस्था निर्माण केली आहे त्याला तुम्ही भूतशाही म्हणता का मग?  की लोकशाहीच ??"

पिंटो," हाहा... नाही आम्ही त्याला लोकशाहीच म्हणतो. काय आहे सुरुवातीला जेव्हा इथे जास्त गर्दी नव्हती तेव्हा इथे सगळेच कशे गुण्यागोविंदाने राहायचे. पण जशी जशी इथे गर्दी वाढत गेली तसं कायदा आणि सुव्यवस्था यांचा अभाव लोकांना जाणवू लागला. म्हणून मग सगळ्यांनी एकत्र येऊन इथे संविधान तयार केलं आणि आमच्या लोकशाहीला सुरुवात झाली. गम्मत अशी आहे की इथल्या एकूण जनसंख्येच्या ६० टक्के लोक हे भारतीयच आहेत.. म्हणून सर्वेसर्वा हा नेहमी आपलाच होतो. इकडे Chinese souls are strictly prohibited. त्यामुळे एखादा आलाच चुकून माकून तर आमचे मेटल बॉडी वरचे सगळे आत्मे सोबत येऊन आपल्या voltage ने repel करतात त्याला. इथे दर सहा महिन्यात एकदा निवडणूक होते आणि सत्ता परिवर्तन होते."

मी, " पिंटो, पण तुम्हाला बोर नाही होत तिथे.. असं भुतासारखं भटकत राहणं."

पिंटो," अरे बोर व्हायला वेळ कोणाकडे आहे इकडे.. आम्ही सगळे आपापल्या कामात इतके बिझी असतो की काय सांगू आणि त्यात मी आता internet hack करून इथल्या तरुण मंडळींची चांगलीच सोय केली आहे. जुन्या engineers नी TV पाहण्याची सोय आधी पासूनच केली होती सगळ्यांची. त्यात आता माझ्या मुळे internet ची भर. तुझ्या आजींना माझ्यात तुझा भास होतो म्हणे म्हणून मला सोबत ठेऊन घेतलं आहे त्यांनी. चला मी बोलून बोलून थकलो आता.. जरा panel वर जाऊन charge होऊन येतो."

असं म्हणून त्याने फोन पुन्हा आजी कडे दिला..

आजी,"कळलं का रे बाळा.. सगळं..?"

        मला जाग आली. माझ्या कानाशी फोनच receiver पडलं होतं. मी माझ्या बिछान्यात होतो. काल रात्री आईशी फोन वर बोलता बोलता मी झोपी गेलो होतो. त्यामुळे फोन खरच dead झाला होता आणि त्यातून त्या low frequency sound waves ऐकू येत होत्या. आजीला जाऊन खरच दहा वर्षे झाली होती. पण तिला स्वप्नात पाहून मी खुश झालो होतो. आता मी या स्वप्नाबद्दल विचार करत करत पुन्हा receiver कानाला लावला. पुन्हा तोच noise.It was an electronic signal I guess..!!!



         A Story By Nachiket Abhay Gadre.

Thursday, 5 October 2017

जिजाऊंच्या आयुष्यातील एक प्रसंग

रात्रीचा तो शांत प्रहर
मंद उजेडातील निरमनुष्य दरबार
चिंताग्रस्तांच्या श्वासातले सुस्कार
शक्यतांच्या अरण्यामध्ये भिरभिरणारा भ्रमर
कडक पाहऱ्यातील किल्ल्याचे महाद्वार
ज्योती प्रकाशात उमटणारी आज्ञेची अक्षरं
कागदावर किंचित थरथरणारे तिचे कर
लिखाणातील तिचे धीर गंभीर स्वर
ती एक राज्ञी, ती एक माता
ती कर्तव्य वाहिनी, ती पुत्रप्रेम दाहिनी
स्वराज्य हि तिचीच संकल्पना
अन तिचा पुत्र लाखोंची प्रेरणा
मनामध्ये भीती, पण चेहेऱ्यावर विश्वास
रयतेमध्ये चैतन्य जनन, हाच तिचा ध्यास
किल्ल्यामध्ये गर्दी अन गर्दीतले राऊळ
जसे मुंग्यांनी भरलेले, असावे ते वारूळ
घोड्यांची पागा, आज होती सुनी सुनी
किती अश्व परततील, कुणाच्या ध्यानी मनी?
गडावरच्या उत्सुकतेला, उरला नव्हता पारा
बंद दारांत अडकलेला, दाऱ्यांमधला वारा
नभामध्ये चमकावी जशी, कडकडणारी वीज
तोफांमधून बरसत होती, तशीच काही चीज
समशेरींच्या खाणाणात, कुणाला होती थारा?
चहू कडे भळभळत होत्या, रक्ताच्या धारा
रणवाद्याने दुमदुमलेला, आसमंत सारा
आरोळ्या उठल्या, जिंका किंवा मरा
ध्रुतराष्ट्राला संजय देई, रण समाचार
आउंपाशी पोहोचे तशी, प्रत्येक खबर
आज्ञापत्र पूर्ण होताच, शिक्का त्यावर उमटला
पत्र घेऊन जासुसाने, घोडा त्वरे दामटला
काही प्रहर तशेच, अंधारात गेले
व्याकुळ मातेला अधांतरी, लटकवून गेले
उगवणाऱ्या सूर्याने भगवा, नाचताना पाहिला
स्वराज्यातला नवा गड, त्याच्या प्रकाशात न्हायला
फडफडता भगवा पाहून, आऊंनी सुस्कार सोडला
स्वराज्याच्या यज्ञामध्ये होता, पुत्र त्यांनी धाडला
प्रत्येक युद्धानंतर त्यांना, वाटे त्याचे सार्थक
कारण त्याग बलीदानच होते, स्वातंत्र्याचे एकक
जिजाऊंच्या आयुष्यातील होता, हा एक प्रसंग
जो आपण अनुभवला, राहून त्यांच्या संग.

                                              - अचलेय
                                              

Monday, 2 October 2017

गोष्ट आम्हा बुटांची

जन्म झाला आणि डब्यात पडलो
जुळे होतो, पण सारखे नाही
आता आमच्याच लेसने
आमचे गळे आवळले जाणार
या कल्पनेने आम्ही जरा धास्तावलोच होतो
एका सकाळी कुणी डबा उघडला
आम्ही झोपेत असतानाच आम्हाला पायात चढवला
आम्ही बाळूच्या पायात होतो
आजी, आत्या आमचं कौतुक करत होत्या
बाळू आम्हाला मिरवत होता
आणि आम्ही बाळूला "मिरवत" होतो
बाळू सोबत आम्ही शाळेस निघालो
नवीन रस्ता, ती सुंदर सकाळ
सगळं काही अनुभवू लागलो
बाळू तसा वात्रटच होता
चालता चालता डावा चिखलात बुचकाळला
मग मी उजवा खुदकन हसलो
कळण्याच्या आतच शेणात माखलो
मग दोघेही आम्ही शांत बसलो
आता आमचा दिनाक्रमच ठरला
रोज सकाळी आत्या काळं फासायची
ब्रशने चकाचक चमकवून टाकायची
 आम्हीपण ऐटीत "पादाक्रांत" व्हायचो
तुडवून घेण्यास सज्ज व्हायचो
पहाता पहाता दिवस लोटले
डावा उजवीकडून आणि मी डावीकडून पार झिजलो
माझ्या कपाळावर छिद्र पडलं
आणि चावट अंगठा डोकं काढू लागला
बाळूने घरी कुरबुर केली
आणि आम्ही पुन्हा एका डब्यात पडलो
मात्र हा डबा फार जीर्ण होता
भुताटकी झालेल्या घरासारखा वाटायचा
आम्हाला वाटलं की हातचं कामच गेलं
आपण आता बेरोजगार झालो
असेच काही दिवस गेले
आणि आमचा डबा कुठेतरी आदळला
झाकण उघडून प्रकाश आत आला
नि आम्ही खडबडून जागे झालो
आजूबाजूला बघतो तर काय
अनेक वस्तूंचे ढिगारे होते
जुन्या वस्तूंचे ते "आश्रमाच" असावे
आता दोघेही आम्ही आशेने बाहेर डोकावलो
येणा-जाणाऱ्याला हाक देऊ लागलो
तिथे बरीच मुलं जमायची
कुत्र्या-डुकरांना हाकलून वस्तू उचलायची
जेव्हा ढिगाऱ्याच्या वरती होतो
तेव्हा साध्या कुत्र्यानी नाही विचारलं
मग आम्ही पण कंटाळून जरा आत गेलो
आणि एके दिवशी आमचा "रेस्क्यू" झाला
मलब्यातनं आम्हाला सुखरूप काढलं गेलं
आम्हाला पुन्हा एकदा सोबती मिळाला होता
त्यानं माझ्या कपाळाची खोक शिवून घेतली
आज तो आम्हाला पायात चढवतो आहे
डाव्याच्या त्याने मुसक्या बांधल्या आहेत
म्हणून तो गप्प बसला
आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली

                                       - अचलेय

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...