Thursday, 5 October 2017

जिजाऊंच्या आयुष्यातील एक प्रसंग

रात्रीचा तो शांत प्रहर
मंद उजेडातील निरमनुष्य दरबार
चिंताग्रस्तांच्या श्वासातले सुस्कार
शक्यतांच्या अरण्यामध्ये भिरभिरणारा भ्रमर
कडक पाहऱ्यातील किल्ल्याचे महाद्वार
ज्योती प्रकाशात उमटणारी आज्ञेची अक्षरं
कागदावर किंचित थरथरणारे तिचे कर
लिखाणातील तिचे धीर गंभीर स्वर
ती एक राज्ञी, ती एक माता
ती कर्तव्य वाहिनी, ती पुत्रप्रेम दाहिनी
स्वराज्य हि तिचीच संकल्पना
अन तिचा पुत्र लाखोंची प्रेरणा
मनामध्ये भीती, पण चेहेऱ्यावर विश्वास
रयतेमध्ये चैतन्य जनन, हाच तिचा ध्यास
किल्ल्यामध्ये गर्दी अन गर्दीतले राऊळ
जसे मुंग्यांनी भरलेले, असावे ते वारूळ
घोड्यांची पागा, आज होती सुनी सुनी
किती अश्व परततील, कुणाच्या ध्यानी मनी?
गडावरच्या उत्सुकतेला, उरला नव्हता पारा
बंद दारांत अडकलेला, दाऱ्यांमधला वारा
नभामध्ये चमकावी जशी, कडकडणारी वीज
तोफांमधून बरसत होती, तशीच काही चीज
समशेरींच्या खाणाणात, कुणाला होती थारा?
चहू कडे भळभळत होत्या, रक्ताच्या धारा
रणवाद्याने दुमदुमलेला, आसमंत सारा
आरोळ्या उठल्या, जिंका किंवा मरा
ध्रुतराष्ट्राला संजय देई, रण समाचार
आउंपाशी पोहोचे तशी, प्रत्येक खबर
आज्ञापत्र पूर्ण होताच, शिक्का त्यावर उमटला
पत्र घेऊन जासुसाने, घोडा त्वरे दामटला
काही प्रहर तशेच, अंधारात गेले
व्याकुळ मातेला अधांतरी, लटकवून गेले
उगवणाऱ्या सूर्याने भगवा, नाचताना पाहिला
स्वराज्यातला नवा गड, त्याच्या प्रकाशात न्हायला
फडफडता भगवा पाहून, आऊंनी सुस्कार सोडला
स्वराज्याच्या यज्ञामध्ये होता, पुत्र त्यांनी धाडला
प्रत्येक युद्धानंतर त्यांना, वाटे त्याचे सार्थक
कारण त्याग बलीदानच होते, स्वातंत्र्याचे एकक
जिजाऊंच्या आयुष्यातील होता, हा एक प्रसंग
जो आपण अनुभवला, राहून त्यांच्या संग.

                                              - अचलेय
                                              

3 comments:

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...