Wednesday, 28 June 2017

धुव्वा...

हवेत उठणारा तो धुवा देवाकडेच जात असावा...
ह्याचे आता किती उरले याचाच हिशोब देत असावा...
आम्हाला वाटायचे हा तर हवेतच विरला...
आमचे सगळे देणे घेणे हा तिथेच विसरला...
ढाळणारी राख म्हणजे याचे अश्रूच असावे...
जीव लावणाऱ्याचाच जीव घेणे त्याचे दुःख असावे...

                                   – अचलेय

No comments:

Post a Comment

शालिग्राम

 धोंडा ओबड धोबड  होतो गोल गुळगुळीत  परी नदीत बुडणे  आले पाहिजे नशिबी  नदीचा तो तळ  तेथे प्रवाह अथांग  ध्यान लागता धोंड्यास  होतो त्याचा शालि...